मधुमेहात घ्या पायांची काळजी

डाॅ. प्रदीप गाडगे

मधुमेह म्हणजे डायबेटीसची वाढती व्याप्ती हा चिंतेचा विषय होत चालला आहे. (खपींशीपरींळेपरश्र ऊळरलशींशी ऋशवशीरींळेप) च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 6 कोटी 50 लाख डायबेटीसचे पेशंट आहेत. डायबेटीसमुळे अनेक गुंतागुंतीचे विकार होऊ शकतात. यात हृदयविकार, पॅरालिसीस, किडनीचे विकार हे होण्याचा संभव असतो. पण यातीलही सर्वात धोकादायक गुंतागुंत म्हणजे डायबेटीक फूट.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पायाच्या नसा आणि रक्तवाहिन्यांवर डायबेटीसमुळे आघात होतो. नसा खराब झाल्याने उद्भवणाऱ्या विकाराला न्यूरोपॅथी म्हणतात. पायात रक्तप्रवाह कमी झाल्याने पायाच्या संवेदना कमी होत जातात. त्यामुळे पायाला जखम झाल्यास वेदना होत नाहीत. सहसा पायाच्या छोट्या जखमांकडे दुर्लक्ष करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु, डायबेटीक पेशंटच्या बाबतीत हे दुर्लक्ष जीवघेणे होऊ शकते. अशा जखमा चिघळण्याने पायाला गॅंगरीन होण्याची शक्‍यता असते. तसेच, रक्तप्रवाह कमी झाल्याने पेरीफेरल आर्ट्रियल डिसीज होण्याचा संभव असतो. गॅंगरीनचे प्रमाण वाढल्यास पाय कापावा (रार्िीींरींळेप) लागतो.

डायबेटीसच्या पेशंटमध्ये पायाचे विकार होण्याची शक्‍यता ही इतरांच्या मानाने 25पट जास्त असते. जगभरात जितकी पाय कापण्याची ऑपरेशन्स होतात, त्यातील 50 ते 75 टक्के पेशंट डायबेटीक असतात. पाय कापण्यात आलेल्या पेशंटपैकी 85 टक्के पेशंटांमध्ये अशा जखमांची सुरूवात एखाद्या लहान जखमेपासून होते. दरवर्षी भारतात 50 हजारांहून अधिक पाय कापावे लागतात.

डायबेटीसमध्ये पायाला एखादी लहानशी जखम झाली आहे असे वाटते, परंतु प्रत्यक्षात ही प्रत्यक्षात हिमनगासारखी असते. जखमेचा थोडा भाग डोळ्यांना दिसतो. परंतु, जखम आत खोल पसरलेली असते. त्यामुळे त्यावर औषधोपचार करणे अवघड जाते. कधी-कधी वारंवार ऑपरेशन करून खराब झालेले स्नायू व पू बाहेर काढावा लागतो. त्यासाठी रोज ड्रेसिंग करावे लागते. जखम खूप गुंतागुंतीची असल्यास हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. इतके करूनही जखमेचा प्रसार आटोक्‍यात आला नाही तर पाय कापणे हा एकमेव पर्याय हाती उरतो. पेशंटचा जीव वाचवण्यासाठी डॉक्‍टरांना हा निर्णय घ्यावा लागतो.

अशी परिस्थिती येऊ नये यासाठी डायबेटिक पेशंटांनी नेहमी सावध राहणे आवश्‍यक आहे. रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्याबरोबर पायाची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.

पुढील काही बाबींकडे लक्ष द्या

  • अनवाणी चालू नका (घरातही)
  • मोज्याशिवाय बूट वापरू नका
  • घट्ट पादत्राणे वापरणे कटाक्षाने टाळा
  • पायाला भोवरी झाल्यास स्वतः कापण्याचा किंवा काही रसायन लावून काढण्याचा प्रयत्न करू नका
  • मसाज किंवा गरम पाण्याचा शेक टाळा
  • सिगरेट, दारू, तंबाखू यांची व्यसने टाळा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)