डायबेटीक किडनी

-डाॅ. उर्मिला जोशी

मधुमेह या आजारात तुमचे शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करत नाही किंवा इन्सुलिनच्या साधारण आवश्‍यक मात्रेचा योग्य वापर करत नाही. आपल्या रक्तातील शर्करेचे म्हणजेच साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे इन्सुलिन म्हणजे शरीरातील एक संप्रेरक असते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास तुमच्या डोळ्यांपासून पायांपर्यंत शरीरातील अनेक अवयवांवर त्याचा परिणाम होतो.

मूत्रपिंडाचे मुख्य काम आहे रक्तातील अशुद्ध घटक आणि अतिरिक्त पाणी गाळून काढणे आणि त्यातून मूत्र तयार करणे. मूत्रपिंडामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्‍यक संप्रेरके तयार करण्यातही मदत होते. मात्र, बऱ्याच कालावधीपासून मधुमेह असल्यास मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचल्यास तुमची मूत्रपिंडे रक्त शुद्धीकरणाचे काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत. मूत्रपिंडाचे नुकसान झाले की, ज्या पद्धतीने त्यांनी रक्त शुद्ध करण्याची आवश्‍यकता असते, त्या पद्धतीने केले जात नाही. त्यामुळे अशुद्ध घटक तुमच्या शरीरात साठत जातात. त्यामुळे तुमच्या शरीरात आवश्‍यकतेपेक्षा अधिक पाणी आणि मीठ शिल्लक राहते. त्यामुळे वजन वाढणे आणि पेडल एडेमा (टाचांना सूज येणे) असे त्रास होतात. तुम्हाला प्रोटीन्युरिया (मूत्रात प्रोटीन्स/प्रथिने) हा त्रासही होऊ शकतो. उच्च रक्तदाब आणि वेदनाशामक औषधांच्या तुलनेत मधुमेह हे मूत्रपिंडाचे आजार होण्यामागील मुख्य कारण आहे.

मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे आजार (डायबेटिक किडनी डिसीज) असलेल्या अनेक रुग्णांमध्ये कदाचित कोणतीच लक्षणे दिसणार नाहीत. हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रक्ततपासणी (इलेक्‍ट्रोलाईट्‌ससह रेनल प्रोफाइल) आणि मूत्रतपासणी. मधुमेह असलेल्या रुग्णांनी किमान वर्षातून एकदा नियमितपणे मूत्रपिंडाची तपासणी करून घ्यावी.

मधुमेही रुग्णांना मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका टाळता यावा यासाठी काही टिप्स –

मधुमेहावर नियंत्रण ठेवा – रक्तातील साखरेचे प्रमाण आणि एचबीएसी (साखरेची तीन महिन्यांतील सरासरी पातळी) नियंत्रित ठेवल्याने हे आजार टाळण्यात किंवा पुढे ढकलण्यात साह्य होते.

रक्तदाबावर नियंत्रण – प्रत्येक मधुमेही रुग्णाने डॉक्‍टरकडे गेल्यानंतर प्रत्येक वेळी तिचा/त्याचा रक्तदाब तपासून घ्यावा. रक्तदाब सातत्याने उच्च पातळीवर असेल तर तुम्हाला औषधांची गरज आहे.
मद्यपान/ तंबाखू/ धूम्रपान बंद करा

एस इन्हिबिटर्स घेऊ नका – तुम्हाला मूत्रपिंडाचे आजार किंवा मूत्रपिंडासंबंधीचे काही त्रास असतील तर तुमच्या सर्व प्रकारच्या डॉक्‍टरांना (दंतचिकित्सक, अस्थिविकारतज्ज्ञ, फॅमिली डॉक्‍टर इ.) तुमच्या क्रिएटिनिन पातळीबद्दल सांगणे आवश्‍यक आहे. त्यानुसार डॉक्‍टर तुम्हाला औषधे देतील.
मलमे, जेल किंवा स्प्रे वापरू नका. यामुळे ते तुमच्या त्वचेत शोषले जाईल.
कोणत्याही प्रकारची नवी औषधे घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्‍टरांचा सल्ला नक्की घ्या.

डीहायड्रेशन (जुलाब/उलटया) टाळा

-तुम्हाला डीहायड्रेशनचा म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा त्रास होत असेल तर तातडीने डॉक्‍टरांना भेटा.
-तुमच्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा.
-पोषक आणि संतुलित आहारासाठी योग्य आहारतज्ज्ञांची भेट घ्या.
-नियमित तपासण्या (दर सहा महिन्यांनी क्रिएटिनिन पातळी आणि वर्षातून एकदा इलेक्‍ट्रोलाइर्टससह रेनल प्रोफाइल)

डोळ्यांची तपासणी – मूत्रपिंडाचे गंभीर आजार असणाऱ्या मधुमेही रुग्णांनी दरवर्षी त्यांच्या डोळ्यांचीही तपासणी करून घ्यावी. मूत्रपिंडाचे त्रास असणाऱ्या मधुमेही रुग्णांना रेटिनोपथीचा त्रास होण्याची शक्‍यता अधिक असते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)