दिया मिर्झा ही बॉलीवूडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सध्या दिया ही काही ठराविक चित्रपटांमध्ये काम करते. परंतु ती बॉलीवूडमध्ये सतत ऍक्टिव्ह असते. यापूर्वी रणबीर कपूरसोबत ती “संजू’ चित्रपटात झळकली होती. संजय दत्तच्या या बायॉपिकमध्ये तिनक मान्यता दत्तची भूमिका साकारली होती.
या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिया मिर्झाने शूटिंगच्या दरम्यान घडणारे अनेक किस्से सांगितले होते. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिला होणा-या एका अडचणीचाही तिने उल्लेख केला होता. एका मुलाखतीत दिया म्हणाली होती की, शूटिंगवेळी प्रत्येकवेळी मान्यतासारखा हसरा चेह-या ठेवण्याने खुपच कठीण होते.
दिया म्हणाली, जेव्हा मी हसत असे तेव्हा माझे दात दिसतात. परंतु मान्यता हसत असताना कधीही तिचे दात दिसायचे नाही. त्यामुळे विना दात दाखविता हसणे माझ्यासाठी खुपच त्रासदायक ठरत होते.
दरम्यान, राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला “संजू’ चित्रपट 2018मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळविले होते. या चित्रपटातून संजय दत्तच्या जीवनातील अनेक गुपिते दाखविण्यात आली होती. तसेच संजय दत्तची भूमिका साकारणा-या रणबीर कपूरच्या अभिनयाचीही खूप प्रशंसा करण्यात आली होती.