दिल्लीत वाहतूक पोलिसांची ‘धुलवड’; एका दिवसात फाडल्या ‘एवढ्या’ पावत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : देशभरामध्ये आज होळीच्या उत्सवामुळे धुमधाम असून देशभरातील लोक मोठ्या उत्साहाने या रंगांच्या उत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत. दरम्यान होळीच्या या पवित्र सणादिवशी राजधानीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून आज दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून संपूर्ण दिल्लीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दिल्ली पोलिसांनी आज वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्ब्ल १३२१९ दिल्लीकरांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये ४३१ जणांवर रस्ता आडविण्यासंबंधी तर १५९१ जणांवर मद्यपान करून वाहन चालविल्या प्रकरणी कारवाईचा समावेश आहे.

https://twitter.com/ANI/status/1108720731179884546

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)