धूलिवंदनच्या गुगल डुडलकडून खास शुभेच्छा

नवी दिल्ली : देशभरात आज धूलिवंदनचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या रंगांनी, गुलालाने धूलिवंदनाचा आनंद लुटला जात आहे. या निमित्ताने गुगलनेही कलरफूल डुडलच्या माध्यमातून धूलिवंदन साजरा करत आहे. धूलिवंदन निमित्ताने गुगलने आगळे-वेगळे डुडल साकारत रंगीबेरंगी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. डुडलच्या माध्यमांतून रंग आणि भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बुधवारी (20 मार्च) होलिका दहन केल्यानंतरच अनेक ठिकाणी सण साजरा करण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये होळी साजरी करताना ‘जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याव्यतिरिक्त PUBG खेळाचा देखील पुतळा जाळला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)