हिंदुस्थान एरोनॉटिक्‍सकडून ध्रूव हेलिकॉप्टर्स पुरवठा

नवी दिल्ली – हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने भारतीय भूसेनादलाला तीन ध्रूव हेलिकॉप्टर्सची पाहिली खेप दिली आहे. भूसेनेने हालबरोबर 40 हेलिकॉप्टर्स पुरविण्याचा करार केला आहे. याच कराराचा भाग म्हणून ही तीन हेलिकॉप्टर्स सुपूर्द करण्यात आली. यापैकी 22 हेलिकॉप्टर्स एएलएच प्रकारची असून 18 हेलिकॉप्टर्स रूद्र या प्रकारातील आहेत.

22 पैकी 19 हेलिकॉप्टर्सची निर्मिती करण्यात आली असून ती टप्प्याटप्प्याने भारतीय सेनेकडे सोपविण्यात येणार आहेत. या हेलिकॉप्टर्सचा उपयोग लढाऊ साधन म्हणून करण्याबरोबरच वाहतुकीसाठीही होणार आहे. ही साडेपाच टन वजनाच्या श्रेणीतील हलकी हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांचा वेग अधिक असल्याने ती झटपट हालचालींसाठी आणि सैनिकांची
वेगाने ने आण करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. चाकांची आणि बिनचाकांची अशा दोन्ही प्रकारची हेलिकॉप्टर्स जोडण्यामध्ये हालचे तंत्रज्ञ कुशल आहेत, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही सर्व चाळीस हेलिकॉप्टर्स भारतीय सेनेला मिळाल्यानंतर तिच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार असून भारतीय भूसेनाची स्वतःची वायुशक्तीही वाढणार आहे. सध्या भूसेनेकडे 20 हेलिकॉप्टर्स असून आणखी 100 ची आवश्‍यकता आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यांची निर्मिती भारतातच करण्यावर सरकारचा आणि हालचा भर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)