#धोरण : पर्याय विजेवरील वाहनांचा भाग 2

-अनिकेत प्रभुणे

पर्याय विजेवरील वाहनांचा भाग 1

भारतातील शहरात आणि महानगरात हवेतील प्रदूषण वेगाने वाढत चालले आहे. यात सर्वात मोठे योगदान हे वाहनातून निघणाऱ्या धूरांचे आहे. याबाबत अनेक वर्षांपासून चिंता व्यक्त केली जात आहे आणि कृती आरखडे तयार देखील करण्यात आले. मात्र अपेक्षेप्रमाणे त्यावर अंमलबजावणी झालेली दिसत नाही. एकीकडे पर्यावरणाचा नारा देत असताना गाड्यांची विक्रमी विक्री होताना दिसून येत आहे. अशा स्थितीत वीजेवर चालणाऱ्या गाडींचा पर्याय हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे.

भारतात वीज आणि पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र याबाबत धोरण कधी तयार होईल, त्यावर अंमलबजावणी कधी होणार हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत. यासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. तोपर्यंत ही समस्या अधिकच किचकट बनलेली असेल.

आपल्याकडे पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे भारतात विजेवरील वाहन चालवण्याचे स्वप्न अद्याप साकार होऊ शकले नाही. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या मते, जर सरकार बॅटरी आणि चार्जिंग स्टेशनचा प्रश्‍न मार्गी लावत असेल तर बाजारात लवकरच वीजेवर चालणाऱ्या गाड्या धावतील.

वाहन कंपन्या अशा गाड्या तयार करण्यासाठी सज्ज आहेत, आता सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे आणि त्यासाठी दीर्घकालीन धोरण अंमलात आणणे महत्त्वाचे ठरते. त्यात सार्वजनिक परिवहन हे केंद्रस्थानी ठेवावे लागेल. जोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुरुस्त होत नाही आणि अशा व्यवस्थेतील वाहने जोपर्यंत वीजेवर चालत नाहीत तोपर्यंत या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांचे अपेक्षित परिणाम समोर येणार नाहीत.

सध्याची स्थिती पाहता भारतातील रस्त्यावर विजेवरील वाहने येण्याची शक्‍यता कमी आहे. परंतु सरकारने याकडे गांभीर्याने पाहिल्यास आणि त्यादृष्टीने पावले उचलली तर भारतही प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि विजेवरची वाहने वापरणाऱ्या देशांच्या पंक्तीत जावू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)