#धोरण : पर्याय विजेवरील वाहनांचा भाग 1

-अनिकेत प्रभुणे

भारतातील शहरात आणि महानगरात हवेतील प्रदूषण वेगाने वाढत चालले आहे. यात सर्वात मोठे योगदान हे वाहनातून निघणाऱ्या धूरांचे आहे. याबाबत अनेक वर्षांपासून चिंता व्यक्त केली जात आहे आणि कृती आरखडे तयार देखील करण्यात आले. मात्र अपेक्षेप्रमाणे त्यावर अंमलबजावणी झालेली दिसत नाही. एकीकडे पर्यावरणाचा नारा देत असताना गाड्यांची विक्रमी विक्री होताना दिसून येत आहे. अशा स्थितीत वीजेवर चालणाऱ्या गाडींचा पर्याय हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे.

आज घडीला दररोज हजारो नवीन गाड्यांची नोंदणी होत आहे. सणासुदीच्या काळात तर अशा विक्रीला उधाण येते. विक्रेत्याकडून ऑफरचा मारा केला जातो आणि वाहन व्रिकीचा ग्राफ उंचावत जातो. त्यावर आळा कसा बसेल, यावर सरकारकडे समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही.

आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी कोट्यवधी वाहने आणि त्यातून निघणारा धूर हा मोठा चिंतेचा विषय आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नीती आयोगाने दोन दिवस विजेवर चालणाऱ्या गाड्यांची गरज, निर्मिती आणि त्यासंदर्भातील निश्‍चित धोरणाबाबत संमेलन भरवले होते. या समेलनात जगभरातील अनेक वाहन निर्मिती कंपन्यांनी हजेरी लावली होती. ग्लोबल मोबिलिटी समिट मूव्ह या परिषदेने भारतात आगामी काळात विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती होऊ शकते, असे संकेत मिळाले आहेत.

पंतप्रधानांनी विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी बॅटरीपासून ते त्याच्या साच्च्याची निर्मिती भारतात तयार करण्यावर भर दिला. वीजेवर चालणारी वाहने ही भारताची आवश्‍यक गरजेपैकी एक बनली आहे. कारण पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपासून जेवढ्या लवकर मुक्ती मिळेल, तेवढे पर्यावरणासाठी आणि भारतातील नागरिकांच्या आरोग्यासाठी पोषक ठरू शकते. असे असताना जगातील अन्य देश हे विजेवर गाडी चालवण्याच्या प्रयत्नात भारताच्या पुढे गेले आहेत.

भारतात अद्याप कोणत्याच वाहन कंपनीने व्यावसायिक पातळीवर अशा प्रकारच्या गाड्यांची निर्मिती सुरू केलेली नाही. या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे.

-पर्याय विजेवरील वाहनांचा भाग 2


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)