‘धूम स्टाईल’ने दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई

सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलिसांनी निरा- बारामती रस्त्यावर करंजेपुल येथे ४६ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यामुळे १४,७०० रुपये रोख महसूल जमा झाला आहे.

या कारवाई मुले सोमेश्वरनगर परीसरात ‘धूम स्टाईल’ सारखी दुचाकी चालवणाऱ्यांवर चांगलीच दमछाक बसणार आहे.
वडगांव निंबाळकर पोलिस सहायक निरीक्षक सोमनथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूक पोलीस डी.पी पानसरे, डी.सी जयनक, एस. ए वाघमोडे, एन.ए नलवडे, महेंद्र फणसे, नितीन बोराडे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस करंजेपुल येथील एका टेकडालगत व महाविद्यालय नजीक दबा दरुण बसले होते. येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून वाहन चालक परवाना, वाहन महत्वाची कागदपत्रे, ट्रिपल सीट अश्या प्रकारची कागदपत्रे तपासणी केली.

सध्या विना परवाना गाडी चालवण्याची नवीन सवय अल्पवयीन मुलांना आणि तरुण पीडिला लागलेली आहे. या कारवाईमुळे ४६ जणांवर कारवाई केल्याचे वाहतुक पोलिस डी.पी. पानसरे यांनी सांगितले. तसेच, सोमेश्वरनगरमध्ये शिक्षण संकुलन मोठ्या प्रमाणात असून सध्या शाळा, महाविद्यालये सुरू आहे. वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर झडप बसावी आणि शालेय मुलींना सुरक्षित वातावरणात शिकता यावं असा आमचा प्रयत्न आहे. यापुढे अश्याच कारवाईने शस्तीचे धडे दिले जातील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)