चौथ्या क्रमांकासाठी धोनीच योग्य – अनिल कुंबळे

नवी दिल्ली  – भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर साजेशी कामगिरी करेल अशा आदर्श फलंदाजाच्या शोधात आहे. त्यासाठी भारताने अनेक पर्यायांचा अवलंब देखील केला आहे. मात्र अजुनही या क्रमांकासाठी आदर्श खेळाडू भारतीय संघाला सापडलेला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस योग्य असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी हाच आहे, असे मते भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्‍त केले आहे.

भारताचे पहिल्या 3 क्रमांकाचे फलंदाज वर्षभरात सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. भारतीय संघाने मिळाविलेल्या यशातील हेच महत्त्वाचे कारण आहे. एकदिवसीय सामन्यात तुमचा संघ यशस्वी व्हायचा असेल तर पहिल्या 3 फलंदाजांनी चांगला खेळ करणे आवश्‍यकच असते. माझ्या मते चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी हाच योग्य पर्याय आहे. 5, 6 आणि 7 या क्रमांकावर फलंदाजी कोण करेल यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. माझ्या मते भारतीय संघाने याच जागांसाठी गरेजपेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. याच कारणामुळे संघाचा समतोल काहीसा बिघडलेला आहे, असे कुंबळेंनी एका मुलाखतीत सांगितले.

इंग्लंडमध्ये 2017मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिले 3 फलंदाज अपयशी ठरल्याचा फटका भारताला बसला होता. पाकिस्तानने भारतावर मात करुन चॅम्पियन्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याच घटनेचा आधार घेऊन कुंबळे म्हणाला, उपांत्य किंवा अंतिम फेरीत समजा तुमचे पहिले 3 फलंदाज चालले नाहीत तर? अशावेळी तुम्हाला पर्यायी फलंदाजांची गरज असते. याच ठिकाणी भारतीय संघ कमजोर पडतोय. मधल्या फळीतल्या फलंदाजांना योग्य त्या संधी दिल्या गेल्या नाहीत. गरजेपेक्षा मधल्या फळीतल्या फलंदाजांवर अनेक प्रयोग झाले. याच कारणासाठी फलंदाजीमध्ये तुमचे सुरुवातीचे 4 फलंदाज मजबूत आणि तंत्रशुद्ध असावे लागतात. याचसाठी धोनी चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय ठरतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)