धायरी फाटा उड्डाणपूल असुरक्षित; भेगा पडल्याचा फोटो व्हायरल

पुणे/खडकवासला – धायरीफाटा येथील उड्डाणपुलावर दोन जॉइंटमधील भागावर भेगा पडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असताना आता हा पूल सुरक्षित असल्याचा दावा पालिकेने केला आहे. वाहतुकीसाठी हा पूल सुरक्षित असल्याचे प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी म्हटले आहे.

महापालिकेकडून धायरी फाटा येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 2015 मध्ये उड्डाणपूल उभारण्यात आला. पुलाच्या जॉइंटला भेगा पडल्या असून पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याची पोस्ट सोशल मीडियावर बुधवारी सकाळपासून फिरत होती. तसेच “नागरिकांनी या पुलावरून प्रवास टाळावा’ असा मेसेजही फिरत होता. ही माहिती महापालिकेस मिळाल्यानंतर प्रकल्प विभाग पथकाने जागेवर जाऊन पाहणी केली, असता जॉइंटच्या ठिकाणी असलेल्या जागेचा हा भाग असून त्यामुळे पुलाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हा पूल पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता या पुलाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आला आहे.

मेसेजमुळे वाहतूक कोंडीत वाढ
पूल असुरक्षित असल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने अनेकांनी भीतीपोटी या पुलाचा वापर टाळल्याने या भागात बुधवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले. सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेनंतरही मोठी वाहनांची गर्दी झाली होती. तर, आधीच अरूंद असलेल्या रस्त्याने पुढे जाण्यास वाहनचालक प्राधान्य देत असल्याने पुलावरील कोंडीत भर पडल्याचे पहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)