धारवाड इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११वर; ६० जखमींना बाहेर काढण्यात यश

धारवाड – कर्नाटक राज्यातील धारवाड येथे निर्माणाधीन इमारत कोसळली असून गेल्या तीन दिवसांपासून मदत कार्य सुरु आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून मलब्याखाली दबलेल्या ६० जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना धारवाड शहरातील कुमारेश्वर भागात घडलेली असून यामध्ये मृतांची संख्या आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप ही इमारत कोणत्या कारणामुळे कोसळली याची शहानिशा संबंधित यंत्रणा करत असून मदत कार्य अविरत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

https://twitter.com/ANI/status/1108675178354130944

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)