धर्मेंद्र यांनी केली शेती करायला सुरुवात

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे एकेकाळी सुपरस्टार म्हणून नावाजले होते. त्यांच्या अभिनयाची क्रेझ आजही चाहत्यांत पाहायला मिळते. मात्र, अलिकडे त्यांनी अभिनयातून विश्रांती घेतली आहे. लाईमलाईटपासून दूर होत त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आता ते त्यांचा संपूर्ण वेळ फार्म हाऊसवर घालवतात. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शेतीचे महत्व पटवून सांगताना दिसत आहेत.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते शेतकरी मजुरांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. शेतीचे काम सोबत मिळून केल्याने त्यात आनंद मिळतो. मी यातच आनंदी असतो, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओवर दिले आहे.

धर्मेंद्र यांच्या या व्हिडिओवर आतापर्यंत लाखो चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सनी देओल आणि बॉबी देओलनंतर आता त्यांचा नातु करण देओल हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तो ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)