#Video : धनगर आरक्षणाची कागदपत्रं गायब, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

धनगर आरक्षणाची कागदपत्रं गायब, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

पुणे – निर्णय घ्यायचा नसला की कागदपत्रंच गायब करण्याचा नवा फॉर्मुला या सरकारनं शोधून काढलाय काय? यापुर्वी संरक्षण मंत्रालयातून राफेलची कागदपत्रं गायब झाली तर आता महाराष्ट्रात कोर्टातून धनगर आरक्षणाची कागदपत्रं गायब. धनगर आरक्षणबाबत सरकार गंभीर नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर केली आहे… सविस्तर वाचा….. https://goo.gl/Rv6vnf#Dhangar_reservation #SupriyaSule

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 12 March 2019

पुणे – निर्णय घ्यायचा नसला की कागदपत्रंच गायब करण्याचा नवा फॉर्मुला या सरकारनं शोधून काढलाय काय? यापुर्वी संरक्षण मंत्रालयातून राफेलची कागदपत्रं गायब झाली तर आता महाराष्ट्रात कोर्टातून धनगर आरक्षणाची कागदपत्रं गायब. धनगर आरक्षणबाबत सरकार गंभीर नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर केली आहे.

-Ads-

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबीनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिल होतं, मात्र त्यानंतर पाच वर्षात अनेक कॅबीनेट होऊन सुध्दा धनगर समाजाला आरक्षण देण्यात आलं नाही. सरकारकडून धनगर समाजाची सातत्याने फसवणूक होत आहे, त्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करते, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, धनगर आरक्षणाची कागदपत्र हायकोर्टातून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. धनगर आरक्षणाबाबत आज मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार होती, पण सरकारी वकिलांनी धनगर आरक्षणाचे कागदपत्र सापडत नाहीत, अशी माहिती दिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)