धनगर समाजाचा पाथर्डीत 29 ला मोर्चा 

शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक : ‘एस.टी’ प्रवर्गात वर्ग करण्याची मागणी

पाथर्डी – धनगर समाजाला “एस.टी’ प्रवर्गात आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर 14 मागण्यांसाठी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने बुधवारी, 29 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती समाजाच्या वतीने देण्यात आली.

-Ads-

येथील शासकीय विश्रामगृहावर या संदर्भात नियोजन बैठक पार पडली. धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी बुधवारी, 29 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची सुरवात खोलेश्‍वर मंदिरापासून होऊन शहरातील प्रमुख चौकातून मोर्चा मार्गस्थ होणार आहे.तालुक्‍यासह बाहेरूनही हजारो संख्येने सकल धनगर समाजातील बांधव शेळ्या, मेंढ्यांसह आंदोलनात सहभागी होणार आहेत.

आरक्षणासह अन्य चौदा मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. अनुसूचित जमातीचे दाखले मिळावे, सोलापूर विद्यापीठाला अहल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, आरक्षण आंदोलकांचे गुन्हे मागे घ्यावे, समाजातील कर्मचारी, अधिकारी यांना पूर्वीप्रमाणे आरक्षण देऊन पदोन्नती द्यावी, शेळी, मेंढी आर्थिक महामंडळास त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले आहे.

जगदीश सोलाट, वसंत घुगरे, भाऊसाहेब उघडे, डॉ. शिवाजी चोरमले, दिगंबर सोलाट, अंकुश ठोंबरे, पोपट क्षीरसागर, सुभाष हंडाळ, अंकुश बोके, अरुण मतकर, सुनील नरोटे, गोविंद दातीर, महेंद्र सोलाट, मिठू नरोटे, चंदू हंडाळ, शेवगाव तालुक्‍याचे प्रा. विनायक नजन, आत्माराम कुंडकर आदिंसह समाज बांधव बैठकीसाठी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)