‘धनंजय मुंडेची शैली दिसतच नाही! कधी मुंडे साहेबांचा भास होतो, तर कधी प्रमोद महाजनांचा’

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम काही महिन्यात पूर्वीच सुरु झाला असून, याला प्रेक्षक सुध्या चांगला प्रतिसाद देत आहे . कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींनी हजेरी लावली आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या मंचावर येऊन दिल खुलास गप्पा मारतात. नुकताच या आठवड्यातील प्रदर्शित झालेल्या भागामध्ये खासदार पूनम महाजन आणि पंकजा मुंडे हे दिसून आले. त्यांनी देखील या मंचावर राजकारणाबद्दल बोलताना जोरदार फटके बाजी केली.

या कार्यक्रमचे सूत्र संचालक मकरंद अनासपुरे यामध्ये नेहमी प्रमाणे रॅपिड फायर खेळ घेतातच. मात्र या वेळेस त्यांनी वेगळा खेळ खेळला. पंकजा मुंडे आणि पूनम महाजन या दोघींसाठी राजकारणावर आधारीत विशेष खेळ यावेळी घेण्यात आला.

गोलाकार चक्रावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो लावून ते चक्र फिरवल्यानंतर जो फोटो काट्यासमोर येईल त्या व्यक्तीबद्दलची एक चांगली आणि वाईट गोष्ट सांगण्याचा हा खेळ होता.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वेळेस विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी खटकणारी आणि आवडणारी गोष्ट अभिनय असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे हे अभिनय चांगला करतात आणि त्यांच्या या अभिनयाच्या दोन बाजू आहेत. त्यांची आवडणारी गोष्ट म्हणजे अभिनय आणि न आवडणारी गोष्ट सुध्या अभिनयच ! त्यांचे भाषण हे अभिनय पूर्ण भाषण असते आणि तेच लोकांना आवडते मात्र यामध्ये त्यांची शैली दिसून येत नाही. असे उत्तर या वेळी पंकजा मुंढा यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
48 :thumbsup:
29 :heart:
8 :joy:
8 :heart_eyes:
10 :blush:
3 :cry:
7 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)