धनंजय मुंडेंचा नाव न घेता पंकजा मुंडेंवर निशाणा !

मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांनी सत्तेला लाथ मारत घातपाताच्या दाव्याची चौकशी कारण्यास सांगितले नाही

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित निर्धार परिवर्तनाचा संकल्प यात्रा अहमदनगर जिल्ह्यात पोहोचली. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बेरोजगारी वरून भाजप सरकारला धारेवर धरले. मुंडे म्हणाले, अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक, हा दावा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्याल करतंय. मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं? देशातील तरूणांना रोजगार देणं तर सोडाच, ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्या पोटावरसुद्धा तुम्ही पाय दिला, अशी टीका त्यांनी केली.

सरकारने शेतकऱ्यांना तूर लावण्यास सांगूनही तूरीला भाव दिला नाही. मंत्री सुभाष देशमुख यांनी तूर डाळीत केलेला भ्रष्टाचार आम्ही उघड केला. त्याची साधी चौकशीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. या घोटाळ्यामुळेच शेतकऱ्यांना तूरीसाठी योग्य भाव मिळाला नाही.तीन लाख रुपयांच्या कर्जबाजारीपणामुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्येतून नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी नांदेड येथे शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली. पाषाण ह्रदयी सरकारला पाझर फुटत नसेल तर मग हे सरकार हवे कशाला?, असा प्रश्न त्यांनी सभेत उपस्थित केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)