#Budget2019 : आजचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला – धनंजय मुंडे

पुणे – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. मात्र आजच्या अर्थसंकल्पबाबत आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

मोदी सरकारनं आज सादर केलेला अर्थसंकल्प ‘चुनावी जुमला’असून गेल्या चार वर्षातली सरकारची पापं धुवून टाकण्यात हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारचा ‘अंतिम’अर्थसंकल्प आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधित कोणतीच घोषणा नाही, दीडपट हमीभावासाठी तरतूद नाही, भावांतर योजना नाही, नाशवंत पिकासाठी कोणतेच संरक्षण नाही. उलट महिन्याला ५०० रूपये देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम या सरकारने केले असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मतांवर डोळा ठेवून अनेक घोषणा सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या असल्या तरी पैसे कोठून येतील? आर्थिक तूट कशी भरली जाईल? याचेही उत्तर मिळालेले नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर जुमलेबाजी करणारं  #Budget2019  भाजपने मांडलं आहे.  पण आता जुमलेबाजीला जनता भुलणार नाही असं धनजंय मुंढे यांनी म्हटलं आहे.

पुढे टीका करताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनाच खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे #Budget2019 होता की सुरज बडजात्याचा हॅप्पी एंडिंग चित्रपट?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)