“गजनी’तील आमीर खानसारखी मोदींची अवस्था : धनंजय मुंडे

पालघर: पाच वर्षांत मोदींनी इतकी आश्वासने दिली की मोदींची अवस्था गजनीतील आमीर खानसारखी झाली आहे. 2014च्या निवडणुकीतील मोदींनी केलेली भाषणे आणि आजची त्यांची भाषणे ऐकल्यानंतर “गजनी’ची आठवण येते, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जमीन विकून आलेला पैसा, पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार टीकत नाहीत, असा खोचक टोलाही त्यांनी लगाविला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेतील जाहीर सभा विक्रमगड येथे झाली. यावेळी ते बोलत होते. मुंडे म्हणाले, चार वर्षे झाली सत्तेत येवून परंतु भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र केला नाही. उलट महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त केले. भाजप सरकारने चार वर्षात अख्खा महाराष्ट्र लुटला आहात. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
जीवनावश्‍यक वस्तुंचे भाव एवढे वाढलेत की, हिशोब केला तर रात्रभर झोप येणार नाही. सरकारमधील अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आमची ताई तर लहान मुलांची चिक्कीच खाऊन गेली, अशी टीका त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अदानी-अंबानी सोबत “धन की बात’
देशावर आज अशा लोकांचे राज्य आहे जे लोक आदिवासींना वनवासी समजत आहेत. आज मनुवादी विचारांचे पुरस्कार करणारे सरकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. मुस्कटदाबी, दादागिरी सुरु आहे. कुणी काय खायचं आणि कसं लिहायचं हे यांनी ठरवायचे. त्यामुळे आता फार मोठ्या जबाबदारीने पाऊले उचलण्याची वेळ आली आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपल्या सोबत “मन की बात’ आणि अदानी-अंबानी सोबत “धन की बात’ असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. ज्याने कधी खेळण्यातली विमानं कधी बनवली नाहीत, त्या अंबानीला राफेलची विमान बनवण्याचा ठेका देण्यात आला, असा आरोपही भुजबळ यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)