मूकबधिर मुलांवर लाठीचार्ज : गृहमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे – धनंजय मुंडे

पुणे – समाजकल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर तरुणांचं आंदोलन सुरू होतं. आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो कर्णबधीर तरुण रस्त्यावर उतरले होते. या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेबदल मंगवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या सभागृहात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, पुण्यात मूकबधीर बांधवांवर लाठीचार्ज केल्याची बातमी मिळत आहे. मूकबधीर  बांधवांवर लाठीचार्ज करून सरकारने असंवेदनशीलपणाचा कळस गाठला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्यांची गृहमंत्र्यांनी तात्काळ हकालपट्टी करावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षणासाठीच आंदोलन करतायेत ना माझे मूकबधीर बांधव? कुणाचा खुन किंवा चोरी तर नाही केली त्यांनी? राज्यात गुंडांचा सुळसुळाट वाढलाय त्यावर काहीच कारवाई नाही. पण मूकबधीरांवर लाठीचार्ज केला जात आहे? असा सवाल गृहमंत्र्यांना विचारत  सभागृहात याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1100002367435460612

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)