पंकजा मुंडेंमुळे बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सभा नाकारली – धनंजय मुंडे

बीड – बीड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होता. त्यानंतर जाहीर सभेचे आयोजन राष्ट्रवादीकडून करण्यात आले होते. त्यासाठी आधीच प्रशासनाकडून परवानगीही देण्यात आली होती. मात्र पंकजा मुंडेच्या दबावामुळे बीड जिल्हाधिकाऱ्यांनी सभेची परवानगी नाकारल्याचा आरोपी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांनी केला आहे. तसेच याविरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

याबदल धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “बीड जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या सभेची परवानगी नाकारून पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासन हे सत्तापक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. दडपशाहीपुढे झुकत निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचे काम केले जात आहे. याचा मी निषेध करतो.”

“आधीच निवेदन देऊन २५ मार्चला भव्य रॅलीची परवानगी आम्हाला मिळाली असतानाही, दुसऱ्या पक्षालाही एकाच मार्गावरून रॅलीची परवानगी देणं हे कायद्याच्या विरोधात आहे. सत्तापक्षाच्या मस्तीत समरस झालेली पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहोत”.

दरम्यान, भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे यांना तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वास असलेले बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. बजरंग सोनवणे  सोमवारी(२५ मार्चला) उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती धनजंय मुंढे यांनी कालच ट्विटरव्दारे दिली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)