धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या भिंतीत थोडंच अंतर! : वाळी

कोल्हापूर – दिवाळी सण दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना कोल्हापुरात मात्र राजकीय दिवाळीला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी आपुलकीची भिंत तर कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी माणुसकीची भिंत उभारून गोरगरिबांना कपडे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या दोन्ही उपक्रमा पाठीमागे राजकीय स्वार्थ जरी असला तरी सामान्य लोकांची मात्र या दिवाळीत चंगळ झाली आहे.

कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौकात खासदार धनंजय महाडिक यांची आपुलकीची भिंत तर टाऊन हॉल चौकात कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी माणूसकीची भिंत उभारलीय. विशेष म्हणजे, या दोघांनी उभारलेल्या आपुलकीची भिंती आणि माणुसकीची भिंत या उपक्रमात काही फुटांचंच अंतर आहे. या दोन्ही ठिकाणी आपल्याला हवे तसे कपडे मिळवण्यासाठी लोकांची झुम्बड उडाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी नवी कोरी कपडे नागरिकांना दिवाळी भेट म्हणून द्यायला सुरुवात केली आहे तर सतेज पाटील यांनी लोकांच्या कडे अधिक असणारी कपडे एकत्र करून त्या कपड्याचे वितरण सुरू केले आहे. या मूळ सहाजीकच या दोन्ही उपक्रमांवर दोघांनी शेरेबाजी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सतेज पाटील म्हणाले कोणी काय उपक्रम राबवत हे माहिती नाही परंतु आम्ही गेले 3 वर्ष माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवत असून राज्यातील इतर शहरात पण माणुसकीची भिंत उभारली गेली आणि कौतुक झालं. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपक्रम राबवत नाही तर सामाजिक कार्य म्हणून राबवतो अस म्हणत धनंजय महाडिक यांना टोला लगावला. तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी दिवाळीला नविन कपडे घालण्याची प्रथा असते म्हणून आम्ही दहा हजार गोरगरिबांना नवीन कपडे दिले तर उद्या वाड्या-वस्त्यांवरील आणि गरीब लोकांना स्पर्धेतील वाटणार आहोत हा कुठलाही पॉलिटिकल इव्हेंट नाहीतर धनंजय महाडिक युवा शक्ती भागीरथी महिला संस्था आणि उद्योग यांच्या मार्फत हा राबवला गेला आहे.

आम्ही काय जुने कपडे दिले नाहीत नवीन कपडे असं म्हणत पाटील यांना टोला लगावला. काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक अली आहे. त्यामुळं आपलं स्थान बळकट करण्यासाठी आणि आपला जनसंपर्क वाढवा यासाठी धनंजय महाडीकांनी हा उपक्रम सुरू केला आहे तर धनंजय महाडिक आणि महादेवराव महाडिक यांना विरोध करणारे सतेज पाटील यांनी देखील आपल्या जनसंपर्काच मध्यम मधून माणुसकीची भिंत सुरू केली आहे. हेतू कोणताही असो यामुळं सामान्य गरजू नागरिकांची मात्र चांगलीच चंगळ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)