बारामती तर सोडाच पण तुम्हाला इतर जागा राखणं तरी जमेल का ? – धनंजय मुंडे

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बारामतीमध्ये फक्त कमळच फुलणार, असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून या वक्तव्यांचा समाचार घेण्यात आला आहे.

‘बारामती तर सोडाच पण तुम्हाला इतर जागा राखणं तरी जमेल का याचा आधी हिशोब लावा’. असं राष्ट्रवादी पक्षाचे  आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बारामतीची जागा जिंकण्याची भाषा केली. तुम्हाला मागच्या वेळी किती जागा जिंकल्या, यावेळी किती जिंकणार याचं गणित मांडता येते. पण आधी दिलेली आश्वासनं पाळणं जमत नाही. त्यामुळं बारामती तर सोडाच तुम्हाला इतर जागा राखणं तरी जमेल का याचा हिशोब लावा’. असं म्हणत फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आता चूक करायची नाही, आता बारामतीमध्ये फक्त कमळ : देवेंद्र फडणवीस

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)