मराठा आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची टीका

पुणे – परळी येथे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू झाले, त्याचवेळी आपण आंदोलकांबरोबर चर्चा करावी, अशी मागणी स्वत: मुख्यमंत्र्यांना केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि राज्यात आंदोलनाचा भडका उडाला. हे आंदोलन राज्य शासनाला हाताळता आले नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्वेनगर येथील दुधाने लॉन्समध्ये रविवारी (दि. 5) “हे थोरय फेसबुकी मित्रमंडळ’नी तिसरा “वशाटोत्सव’ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या उत्सवाला जेष्ठ पत्रकार निखील वागळे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, नगरसेविका लक्ष्मीबाई दुधाने उपस्थित होते. पुण्यात वशाटोत्सव साजरा करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून, ते आपल्या बनावट खात्यावरुन राज्यसरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लिखाण करतात, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषदेत केला होता. “आमच्या खऱ्या नावानेच लिहीत असतो,’ हे सांगण्यासाठी “हे थोरय फेसबुकी मित्रमंडळा’ने पुण्यात तिसरा “वशाटोत्सव’ आयोजित केला होता.

सध्या सत्तेत असलेल्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मराठा आरक्षणाचा लढा पुढे गेला असून, मराठा समाज बांधव आरक्षणासाठी आपले बलिदान देत आहेत. असे असताना सरकार गप्प का? असा प्रश्‍न मुंडे यांनी उपस्थित केला. आज देशाची लोकशाही धोक्‍यात आली आहे. यापुढची लढाई ही सोशल मीडियाशिवाय लढता येणार नाही. सध्याची परिस्थिती सरकारविरोधात आहे. जनतेने भाजपला राज्यात आणि केंद्रात सत्ता दिली. मात्र, त्यांना सरकार चालवता येत नाही, असेही मुंडे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मोहसीन शेख यांनी तर सूत्रसंचलन उद्धव काळापहाड यांनी केले. फेसबुकवर सतत लिखाण करणारे सुमारे एक हजार तरुण यावेळी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)