जम्मू-काश्मीरचे डीजीपी वैद यांची पदावरून उचलबांगडी

जम्मू-काश्मीर : जम्मू – काश्मीर राज्याचे डीजीपी एसपी वैद यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांच्याजागी दिलबाग सिंग जम्मू-काश्मीर राज्याचे नवे डीजीपी असणार आहेत. दिलबाग सिंग १९८७च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी  आहेत आणि ते सध्या प्रिजन डीजीपी आहेत. एसपी वैद हे आता वाहतूक कमिशनर हे पद सांभाळतील.

जम्मू-काश्मीर मधील खोऱ्यात पुलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आतंकवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी एका दहशतवाद्याच्या पित्याला सोडले गेले होते. या निर्णयामुळे केंद्रा सरकार खूप नाराज झाले होते. या निर्णयानंतर पोलीस खात्यात अनेक बदल करण्यात येत आहेत त्यातीलच एक भाग म्हणून एसपी वैद  यांना आपले पद  सोडावे लागले आहे.

एसपी वैद  यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करतआपल्या बहवना प्रकट केला. ते म्हणाले,  “माझ्या लोकांची आणि देशाची सेवा करण्याची मला संधी दिल्यामुळे मी देवाचा आभारी आहे. जमु-काश्मीर पोलीस, सुरक्षा एजन्सीज आणि जम्मू-काश्मीरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला तांबाबद्दल देखील मी आभारी आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)