निकृष्ट बर्फ : 19 जणांवर  दंडात्मक कारवाई 

पुणे – निकृष्ट बर्फामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये, यासाठी यंदाही अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात आली. “एफडीए’च्या वतीने गेल्या तीन महिन्यांत केलेल्या कारवाईत 19 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. Devious snow: Penalty action against 19 people

उसाचा रस, लिंबू सरबत आणि अन्य थंड पेयासाठी बर्फाचा वापर केला जातो. त्यासाठी खाजगी कारखान्यांकडून या दुकानांना बर्फ पुरविला जातो. बर्फ तयार करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नियमावली तयार केली आहे. मात्र, बहुतांशी कारखानदार या नियमावलीचे पालन करत नाहीे. निकृष्ट पाण्याचा वापर करणे, बर्फ चांगल्या जागेत न ठेवणे, स्वच्छता न ठेवणे, कामगारांची आरोग्य तपासणी न करणे यामुळे अनेक नागरिकांना त्यापासून अपाय निर्माण झाला आहे. त्यामुळे बर्फाचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 19 कारखान्यातील बर्फ निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)