गृहमंत्र्यांच्या दिव्याखाली अंधार ; राष्ट्रवादीचे टीकास्त्र !

जवानांना मारणाऱ्या पोलिसांमुळे महाराष्ट्राची मान खाली

मुंबई: एकीकडे पुलवामा येथे सीआरपीएफच्या ४४ जवानांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली, तर दुसरीकडे सीआरपीएफच्या जवानाला महाराष्ट्रात पोलिसांनीच मारहाण केली. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द निराशाजनक होतीच. त्यात आता या संतापजनक घटनेची भर पडली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाला परवानगी मागण्यासाठी सीआरपीएफचे जवान अशोक इंगवले बारामती पोलिस ठाण्यात आले होते. पण बारामती तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना खोलीत डांबून मारहाण केली. धक्कादायक म्हणजे अशोक इंगवले हे गणवेशात असूनही बारामती पोलिसांनी हे ‘शौर्य’ दाखवले. इंगवले यांच्यासोबत माजी सैनिक किशोर इंगवले होते, त्यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली. संपूर्ण देश पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफ जवानांना आदरांजली वाहतोय, त्यांच्या शौर्याला वंदन करतोय, असे चित्र असताना भाजपाच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रातील सरकारचे पोलिस हा प्रकार करतायत. त्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली असल्याचे देखील राष्ट्रवादीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)