17 प्रसिद्ध शहरांचा विकास करणार 

नवी दिल्ली – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयासाठीच्या तरतूदीमध्ये 1.82 टक्‍क्‍यांची अंशतः वाढ करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामांसाठी 1,378. 53 कोटी रुपयांची तर पर्यटन प्रकल्पांच्या प्रसिद्धी ेआणि प्रोत्साहनासाठी 575.5 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. तर सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रकल्पांसाठी 875.33 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

देशात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 17 प्रतिष्ठित शहरांचे बांधकाम केले जाणार आहे. ही शहरे जागतिक पातळीवर लोकप्रिय होण्याच्या दृष्टीने या शहरांचा विकास केला जाणार आहे. या शहरांना देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी आणि त्यातून पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे. 2018-19 साली पर्यटन क्षेत्राला 2,150 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. तर 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 2,189.22 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

तर सांस्कृतिक मंत्रालयासाठी 2,843.32 कोटी रुपयांची तरतूद वाढवून 3,042.35 कोटी रुपये करण्यात आली आहे. देशातील समृद्ध संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी दस्तऐवज, लोकसंगीत, लोकनृत्य, वास्तू, शिल्पकलेची छायाचित्रे, व्हिडीओ आणि पुरातनशास्त्राचे संदर्भ असलेल्या सांस्कृतिक वारस्याचे डिजीटल सादरीकरण करण्यात यावे, अशी जबाबदारी सांस्कृतिक मंत्रालयावर असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)