कचरा वाहतुकीचा उद्‌घाटनामुळे खोळंबा

पिंपरी – घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी नव्या निविदेनुसार सोमवारपासून (दि. 1) कामाला सुरवात झाली. काही भागांमध्ये पहिल्याच दिवशी कचरा वाहतुकीची वाहने उशिरा पोहचली. काही कॉम्पॅक्‍टर वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. पर्यायाने, काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले होते. यामुळे पहिल्याच दिवशी कचरा वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. कृष्णानगर येथे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सकाळी या कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. शहरातील 32 प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते उद्‌घाटन करून कचरा संकलनाला सुरवात झाली.

प्रभागांतील कचरा संकलन करण्यापूर्वी वाहनांची पूजा, उद्‌घाटनाचा कार्यक्रम झाल्याने कचरा संकलनासाठी वाहने घरोघरी पोहचण्यास उशीर झाला. मोठ्या कॉम्पॅक्‍टर वाहनांद्वारे कचराकुंड्यांमधील कचरा उचलताना तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. तसेच, काही वाहनांचे आरटीओ पासिंग न झाल्याने वाहने वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. “ब’ आणि “ग’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत अडचणी जाणवल्या. कचरा गोळा करणे व वाहतूक करण्याचे काम ए.जी.एन्व्हायरी इन्फ्रा आणि बी.व्ही.जी. इंडिया यांना दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले की, काही अपवाद वगळता कामाला योग्यरित्या सुरूवात झाली. आज सुरवात असल्याने उद्‌घाटन, वाहनांची पूजा आदी कार्यक्रमांमुळे उशीर झाला. काही ठिकाणी कॉम्प्क्‍टर वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. मंगळवारपासून वाहने वेळेवर पोहचतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)