परवानगी असून सुद्धा मराठी कलाकारांच्या होळीवर पोलिसांची कारवाई 

मुंबई: रीतसर परवानगी असून देखील मुंबई पोलिसांनी मराठी कलाकारांच्या होळीवर आक्षेप घेतला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी कलाकारांच्या होळीवर कारवाई करण्याचा इशारा दिला. मराठी कलाकारांच्या ‘रंगकर्मी’ संस्थेमार्फत गेले अनेक वर्षपासून मराठी कलाकार एकत्र येऊन हा सण साजरा करतात.

शिवाजी पार्क परिसर हे शांतात क्षेत्र असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे स्पीकर लावता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र,आमच्या कडे रीतसर परवानगी असूनदेखील आक्षेप का ? असा प्रश्न अभिनेता सुशांत शेलार आणि अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

आमच्या कार्यक्रमाची सर्व तयारी झाली असताना पोलिसांनी अचानक परवानगी नाकारली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी या प्रकणात लक्ष घालावे, अशी विनंती अभिनेता सुशांत शेलार आणि अमेय खोपकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)