रणवीरसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा – सोनाक्षी

“लुटेरा’ चित्रपटाला नुकतीच 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त्‌ चित्रपटातील लीड पेयर रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हाने थ्रोबॅक पिक्‍स शेअर केले आहेत. यामधील काही चित्रपटाशी संबंधीत आहेत, तर काही शुटिंगच्यादरम्यानचे आहेत. यावेळी सोनाक्षीने रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे.

सोनाक्षी आणि रणवीरने चित्रपटाला सहा वर्षे पूर्ण झाल्याने इंस्टाग्राम स्टोरीजवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांनाही खुप आवडले असून त्यांनी दोन्ही कलाकारांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी “लुटेरा’ चित्रपटातील प्रसंग हे आपल्या जीवनातील खास असल्याचे सोनाक्षीने सांगितले. ती म्हणाली, लुटेरा हा माझ्या आजपर्यंतच्या करियरमधील सर्वांत खास चित्रपट आहे. या चित्रपटासंबंधीत एकही गोष्ट मी बदलु इच्छित नाही. मला अभिमान आहे की, मी या चित्रपटाचा एक हिस्सा आहे.

रणवीरसोबत पुन्हा काम करू इच्छिते का? असे विचारले असता सोनाक्षीने होकार दर्शविला. सोनाक्षी म्हणाली, त्याच्या करिअरच्या प्रारंभी को-स्टार आणि एका मित्राच्या नाते मला रणवीरचा गर्व आहे. मी त्याला यशाच्या शिखरावर चढताना पाहिले असून त्याच्यासोबत पुन्हा एकदा लुटेरा मॅजिक क्रिएट करणे माझ्यासाठी आनंदाची बाब असले, असे तिने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)