शिवराज्याभिषेक सोहळ्यास येणार देशोदेशीचे राजदूत

युद्ध-कलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम

पुणे – यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युद्ध-कलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शिवराज्यभिषेक सोहळा जगभरात पोहचण्यासाठी विविध देशांच्या राजदुतांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे देण्यात आली. हा सोहळा दि.6 जून रोजी किल्ले रायगड येथे होत आहे.

शिवराज्यभिषेक सोहळा समिती दि.5 व 6 जून रोजी रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीविषयी पुण्यात शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार छत्रपती संभाजीराजे, युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, राजेंद्र कोंढरे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, समितीचे सदस्य धनंजय जाधव यांच्यासह शिवभक्‍त उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “यावर्षी राज्यभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा जगभरात पोहचविण्यासाठी विविध देशांच्या राजदुतांना आमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच दरवर्षीप्रमाणे महादरवाज्यात कोंडी होऊ नये, यासाठी समितीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. कोंडी टाळण्यासाठी नाना दरवाजा येथील मार्ग गड उतरण्यासाठी आणि चित्त दरवाजा येथील मार्ग गड चढण्यासाठी वापरण्यात येणार आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)