मसूद अझहरचे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये घालण्याच्या प्रक्रियेला चीनकडून खोडा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रलंबित मागणीला चीनने पुन्हा एकदा विरोध केला आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मसूद अझर या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील आहे मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जातो.

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवाया केल्या असून नुकताच पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी देखील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती.भारतामध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली होती. फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने मसूद अझर या दहशतवाद्यास संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी प्रयत्न देखील केले होते मात्र यावेळीदेखील चीनने मसूद अझरचा पुळका दाखवत चीनला याबाबत विचार करण्यासाठी आणखीन वेळ हवा असल्याचे कारण पुढे करत या प्रक्रियेला खोडा घातला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)