पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 देशांचा समावेश असून यामध्येही चीन देखील आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असे मत व्यक्त केले होते.
यातच संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीत मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित करण्यात येण्याची शक्यता दर्शविली जात आहे. भारतासह अमेरिकेने सुद्धा दहशतवादी हल्लाबाबत भाष्य केले आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट पल्लादिनो यांनी आम्ही भारताबरोबर असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, संपूर्ण देशात शांतता स्थापित झाली पाहिजे. मसूद अझहर हा भारतातील शांततेसाठी धोका आहे. मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित केले पाहिजे. या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची सहमती आहे.
US State Dept Dy spokesperson Robert Palladino: Masood Azhar is the founder and the leader of JEM, and he meets the criteria for designation by the United Nations. JEM has been responsible for numerous terrorist attacks and is a threat to regional stability and peace. https://t.co/AfEpyFGlSm
— ANI (@ANI) March 13, 2019