मुलाला तिकीट नाकारल्याने ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

प्रातिनिधिक छायाचित्र,

ओडिशा : देशभरामध्ये सध्या निवडणुकांचे जोरदार वारे वाहत असून विविध राजकीय पक्षांमधील नाराजांच्या पक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. अशातचं आज आपल्या मुलाला लोकसभेचं तीकीट नाकारल्याने नाराज झालेल्या बीजु जनता दलाच्या एका जेष्ठ नेत्याने पक्षाला राम-राम ठोकला आहे. बीजु जनता दलाचे खासदार अर्जुन चरण सेठी यांनी आपले पुत्र अभिमन्यु सेठी यांना पक्षाने खासदारकीचे तिकीट नाकारल्याने राजिनामा दिला असून त्यांनी याबाबत पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांना एका पत्राद्वारे माहिती दिली आहे.

दरम्यान, नवीन पटनाईक यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्जुन चरण सेठी यांनी “आपण आपले वय झाले असल्या कारणाने आपल्या जागेवरून पुत्र अभिमन्यु सेठी यास तिकीट देण्यात यावे अशी मागणी केली होती, माझ्या मागणीबाबत पक्ष नेतृत्वाकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते मात्र माझ्या मुलाचे नाव निर्णायक यादीतून कापण्यात आले. मी आपली (नवीन पटनाईक) भेट घेण्यासाठी आपल्या निवास्थानी देखील आलो होतो मात्र मला आपली भेट घेण्यासाठी आत सोडण्यात आले नाही. मी गेल्या ४० वर्षांपासून पक्षाचा निष्ठावंत आहे मात्र माझ्या वृद्धापकाळात मला अशी मानहानीकारक वागणूक देण्यात आल्याने मी नाराज असून राजीनामा देत आहे.” असा संदेश लिहिला आहे.

https://twitter.com/ANI/status/1111954624142032896

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)