पद्म पुरस्कारप्राप्त महिलेचा व्हिसा अर्ज रद्द

मथुरा – भारतात राहून मागील 25 वर्षांपासून गोसेवा करणारी जर्मन नागरिक प्रेडरिके इरीना ब्रूनिंग यांचा व्हिसा कालावधी वाढविण्यास विदेश मंत्रालयाने नकार दिला आहे.

प्रेडरिके यांना यंदाच पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. व्हिसा कालावधी वाढविण्यास नकार देण्यात आल्यावर त्यांनी समाजमाध्यमांवर पुरस्कार परत करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याप्रकरणी विदेश मंत्री स्वराज यांनी स्वतःच्या विभागाकडून अहवाल मागविला आहे.

दरम्यान, जर्मनीच्या नागरिक इरेना प्रेडरिके मथुराजवळील राधाकुंड येथे अनेक वर्षापासून गोशाळा चालवितात. मात्र, त्यांचा व्हिसा वाढविण्यास सरकारने नकार दिला असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांनी त्यांना या कामासाठी मिळालेली पद्मश्री सरकारला परत करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. या विषयात आता परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी लक्ष घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)