लग्नास नकार; युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

युवकास अटक : दोघेही संगणक अभियंता

पुणे – विवाहाचे आमिष दाखवून संगणक अभियंता युवतीबरोबर विवाह करण्यास सहकारी अभियंता युवकाने नकार दिल्याने युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आला आहे. दरम्यान, युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मित्राला अटक करण्यात आली आहे.

अमित नंदकिशोर जोशी (वय 24, सध्या रा. कात्रज, मुळ रा. धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 26 वर्षीय युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी आणि युवती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघे एकत्र राहात होते. युवतीने गेल्या महिन्याभरापासून अमितकडे विवाहाबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिला. विवाहास नकार दिल्यानंतर युवती नैराश्‍यात होती. त्यामुळे तिने विषारी द्रवपदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)