मंदिरासाठी निदर्शने करणे निरर्थक ; आता अध्यादेश हाच पर्याय : शंकराचार्य  

त्यासाठी पंतप्रधानांवर दबाव आणा

मथुरा: राम मंदिरासाठी भाजपने आणि त्यांच्या परिवारातील संघटनांनी निदर्शने करणे पुर्णपणे निरर्थक आहे. त्याचा काही उपयोग नाही. मंदिरासाठी आता केवळ अध्यादेश हाच एक मार्ग आहे असे प्रतिपादन शंकराचार्य अध्योक्षजानंद यांनी केले आहे. या विषयावरून देशात मुस्लिमविरोधी वातावरण तयार करू नये तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारालाही आव्हान दिले जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. लोकांनी याच विषयावरून भाजपला पुर्ण बहुमत दिले आहे त्यामुळे त्यांनी हा विषय मार्गी लावण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. तेथील सुनावणीची प्रक्रिया वेगाने पार पाडली पाहिजे ते शक्‍य नसेल तर अध्यादेश काढून हा विषय मार्गी लावला पाहिजे. या विषयावरून अयोध्या किंवा देशाच्या अन्य भागात निदर्शने करून शक्ती वाया घालवण्याची गरज नाही. त्याऐवजी भाजप आणि त्यांच्या परिवारातील संघटनांनी आता थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावरच आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे त्यांनी सुचवले. एकत्रितपणे पंतप्रधानांवर दबाव आणणे हीच त्यासाठी गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. प्रभु रामचंद्रावर सर्व जातीधर्माचा आणि देशाचा अधिकार आहे त्यामुळे मंदिर उभारणीसाठी सर्वांची मदत घेतली जावी असे जे विधान उमा भारती यांनी केले आहे त्याचेही त्यांनी स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)