अमेरिकेतील शटडाऊन समाप्तीसाठी डेमॉक्रेटिकची मतदानाची मागणी

वॉशिंग्टन (अमेरिका): मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्यसाठीच्या बजेटवरून अमेरिकेत चालू असलेला आंशिक शटडाऊन अजूनही चालूच आहे. तो समाप्त करण्यासाठी डेमॉक्रेटिक सांसद मतदानाची मागणी करणार आहेत. गुरुवारी प्रतिनिधी सभेत विनियोग विधेयकावरील चर्चेनंतर मतदान घेण्यात येणार आहे.

अमेरिकेत येणाऱ्या अवैध प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी निधी मंजूर करावा यासाठी अध्यझ डोनॉल्ड ट्रम्प अडून बसले आहेत. मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधल्याविना सीमा सुरक्षित होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र डेमॉक्रेटिकने त्यासाठी आवश्‍यक निधी मंजूर करण्यास नकार दिला होता, त्यानंतर ट्रम्प यांनी व्यापक खर्च पॅकेजवरही सही केली नाही. परिणामी क्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्यांदरम्यान सरकारी कामकाज ठप्प झाले. आता तो ट्रम्प आणि ड्‌मॉक्रेटिक यांच्यातील शक्तिपरीक्षणाचा मुद्दा बनला आहे.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांनंतर प्रतिनिधी मंडळात डेमॉक्रेटिक पक्षाचे बहुमत झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)