कंपनी नोंदणीसाठी अंक्षांश-रेखांशाची गरज

-शिवाय कंपनीच्या इमारतीचे व प्रवर्तकाचे छायाचित्र अपरिहार्य

-बनावट कंपन्यांची नाकेबंदी करण्यासाठी नवे नियम

नवी दिल्ली – बनावट कंपन्या म्हणजे शेल कंपन्यांना आळा घालण्यासाठी आता नव्या कंपन्यांची नोंदणी करताना त्या कंपन्यांच्या इमारतीचे, त्याचबरोबर इमारतीच्या निश्‍चित भौगोलिक ठिकाणासाठी अक्षांश आणि रेखांश यांची माहिती नोंदणी करण्याच्या कागदपत्रावेळी सादर करावी लागणार आहे. त्यामुळे बनावट कंपन्या नोंद करणे अवघड जाईल. त्याचबरोबर जर त्या कंपन्या शोधायच्या झाल्या तर सरकारी यंत्रणांना सोपे जाणार आहे.

एवढेच नाही तर नव्या कंपन्या निवडताना त्या कंपनीच्या मुख्य व्यक्तीचे छायाचित्र नोंदणी करण्याच्या कागदपत्रांवर जोडावे लागणार आहे. त्यामुळे जर कंपनीने अयोग्य काम केले तर ती कंपनी आणि त्या कंपनीच्या मुख्य प्रवर्तकाना आता शोधणे सोपे जाणार आहे. बनावट कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून पैसा वळविणे, काळा पैसा निर्माण करणे अशा बाबी घडतात. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अशा लाखो कंपन्या बंद केल्या आहेत. आगामी काळातही अश्‍या प्रकारच्या खोट्या कंपन्याकडे सरकारची करडी नजर राहणार आहे, असे अधिकाऱ्यानी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठी कंपनी व्यवहार मंत्रालयाने एक नवा इलेक्‍ट्रॉनिक फॉर्म जारी केला आहे. या फॉर्मचे नाव ऍक्‍टिव्ह एक असे आहे. या फॉर्ममध्ये कंपन्यांचे ऑडिटर आणि मुख्य व्यक्तीची माहिती नोंदणीवेळी जोडावी लागणार आहे.

त्यामुळे कंपनी कोणाची आहे, कुठे आहे याची माहिती कंपनी व्यवहार मंत्रालय आणि कर विभागाच्या अधिकाऱ्यांना सहज मिळणार आहे. 31 डिसेंबर 2017 रोजी किंवा यापूर्वी नोंदणी करण्यात आलेल्या कंपन्यांना हा नवा फॉर्म भरावा लागणार आहे. यासाठी सरकारने 25 एप्रिल ही मुदत दिली आहे. जर या मुदतीत हा फॉर्म भरला नाही तर दहा हजार रुपयांचा दंड द्यावा लागेल. त्याचबरोबर कंपनीने वेळेवर माहिती दिली नसल्याचे रेकॉर्डवर नोंदण्यात येईल. ही मोहीम आगामी काळातही चालूच राहणार असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंपनी कायदा अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच कार्यालयाचे छायाचित्र त्याचबरोबर अक्षांश आणि रेखांश याची माहिती सादर करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात बनावट कंपन्या नोंदणे आणि त्या चालविणे फारच अवघड होणार आहे. यासाठी कंपनी कायद्यात आवश्‍यक ती दुरुस्ती करण्यात आली असून ही अधिसूचना पुढील आडवड्यापासून म्हणजे 25 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब स्पष्ट केली की, ज्या कंपन्यांची नोंदणी रद्द केली आहे किंवा कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया चालू आहे त्या कंपन्यांना हा नवीन फॉर्म भरून द्यावा लागणार नाही. या घटनाक्रमाबाबात बोलतांना याबाबत नांगीया ऍडव्हायझरी या कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला यांनी सांगितले की, या अगोदर नियमातील त्रुटीचा वापर करून या कंपन्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केले जात होते मात्र आता नव्या नियमामुळे याला बराच आळा बसणार आहे. त्याचे स्वागत करण्यीा गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)