कोपरगावच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

कोपरगाव  – कोपरगाव शहराच्या रस्त्यांसाठी मिळालेला निधी हा फक्त कागदोपत्री आहे. त्यामुळे शहरातील रस्ते कधी होणार याची शहरवासीयांना माहिती नाही. त्यामुळे शहरवासीयांनी रस्ता संपूर्ण दुरुस्तीची आशा तर सोडलीच आहे पण किमान या रस्त्यांवरील खड्डे तरी बुजवा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे केली आहे.

कोपरगाव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना कोपरगाव शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील सतत वर्दळ असणाऱ्या महत्वाच्या सर्वच रस्त्यांवर तसेच उपनगरातील विविध रस्त्यांवर अनेक लहान-मोठे खड्डे पडले असून हे खड्डे तातडीने बुजवावे. या खड्ड्यातून मार्गक्रमण करतांना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे. अ

पघातांना आमंत्रण देणारे हे खड्डे नगरपरिषदेने तातडीने बुजवावे. या खड्ड्यांमुळे रोज लहान- मोठे अपघात घडत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच उपनगरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. सर्वच रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, वाल्मिक लहिरे, तेजस साबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)