तिसऱ्यांदा मतदानाची थेरेसा मे यांची मागणी

लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावर संसदेमध्ये तिसऱ्यांदा मतदान करण्याची तयारी दर्शवली आहे. कोणत्याही तडजोडीशिवाय ब्रिटनने युरोपिय संघामधून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ नये यासाठी मे यांनी हे पाऊल उचलले आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये खासदारांकडून ब्रेक्‍झिटच्या पर्यायांच्या निवडीसाठी मतदान केले जाणार असे निश्‍चित झाल्यावर थेरेसा मे यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. विरोधकांचे मन वळवण्याचा थेरेसा मे यांचा हा अखेरचा प्रयत्न मानला जात आहे. युरोप आणि ब्रिटनमधील व्यवहारांमध्ये अत्यंत तीव्र स्वरुपाचे आर्थिक संकट आणि वित्तीय अराजकतेची अवस्था निर्माण होऊ नये यासाठी थेरेसा मे यांनी स्वतःचे पद देखील सोडायची तयारी दर्शवली.

संसदेमध्ये तिसऱ्यांदा मतदान घेण्याची परवानगी मिळावी याची सभापती जॉन बेक्रो यांच्याकडे मे यांनी याचना केली असल्याचे हाऊस ऑफ कॉमन्सच्या नेत्या ऍड्रीया लीडसम यांनी सांगितले. बेक्रो यांनी तिसऱ्यांदा मतदानाचा प्रस्ताव यापूर्वी गेल्या आठवड्यातच फेटाळला आहे. थेरेसा मे यांनी यापूर्वी दोन वेळा मांडलेला प्रस्ताव संसदेने फेटाळला आहे. तशाच स्वरुपाचा प्रस्ताव त्यांच्याकडून मांडला जाण्याची शक्‍यता बेक्रो यांनी व्यक्‍त केली. युरोपिय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी “ब्रेक्‍झिट’ची मुदत 22 मे पर्यंत वाढवली आहे. मात्र कोणत्याही तडजोडीशिवाय ब्रिटन युरोपिय संघातून बाहेर पडल्यास त्याचा फटका ब्रिटनमधील उद्योगांना बसू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)