श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याची मागणी

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती बदलण्याची मागणी तिच्या भक्ताने केली आहे. मूर्ती पाच ठिकाणी भंगलेल्या अवस्थेत असल्यामुळे ही मूर्ती त्वरित बदलावी, अशा मागणीचे निवेदनही प्रशासनाकडे सादर केलेले आहे. देवीची मूर्ती बदलण्याची मागणी करणाऱ्या भक्तांची संख्या वाढली आहे. दरम्यान करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती बदलण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे.

देवीची मूर्ती शेकडो वर्ष भग्नावस्थेत उभी आहे. देवीकडे पुजाऱ्यांचे, देवस्थान समितीचे लक्ष नसल्याने आता भाविकांनी भंगलेली मूर्ती बदलून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी, अशी विनंती केलेली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे 1917पासून आजपर्यंत शंभर वर्षात पाच ठिकाणी मूर्ती भंगलेली आहे. 2016मध्ये मूर्तीचे संवर्धन केले. त्यावेळी संवर्धन प्रक्रियेत मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे पुरातत्त्व खात्याने जाहीर केले होते.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक संपूर्ण देशातुन कोल्हापुरात दाखल होत असतात. दरम्यान, 2014 साली भंगलेली मूर्ती बदलण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. यासंदर्भात श्रीपूजक आणि देवस्थाने पुढाकार घेतला तर देवीची भंगलेली मूर्ती बदलून त्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)