नेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे – नेपाळी मुस्लिमांची मागणी 

काठमांडू  – नेपाळ हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी मागणी नेपाळी मुस्लिमांनी केली आहे. नेपाळी मुस्लिमांचा हिंदू राष्ट्राला नुसता पाठिंबाच आहे, असे नाही तर ती त्यांची मागणी आहे. त्या बाबत त्यांनी स्पष्टिकरणही दिले आहे. एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रापेक्षा हिंदू राष्ट्रात मुस्लिमांना अधिक सुरक्षित वाटते असे त्यांनी म्हटले आहे.

नेपाळ राष्ट्रीय मुस्लिम समाजाचे प्रमुख अमजद अली यांनी सांगितले की, इस्लामच्या सुरक्षिततेसाठी ही आवश्‍यक गोष्ट आहे. आमचा धर्म सुरक्षित राहावा यासाठी आम्ही हिंदू राष्ट्राची मागणी केली आहे. नेपाळने धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याची आवश्‍यकता आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे सीपीएन-यूएमएलचे सदस्य अनारकली मियांना यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांना ख्रिश्‍चन करण्याची मिशनऱ्यांची मोहीम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुस्लिम मुक्ती मोर्चाचे प्रमुख उदबुइद्दीन फ्रू यांचेही तसेच मत आहे. देशाला धर्मनिरपेक्ष बनवण्याच्या प्रयत्नात हिंदू-मुस्लिम एकता भंग पावण्याचाच धोका जास्त आहे, असे नेपाळ गंज मुस्लिम मंचचे बाबू पठाण खान म्हणतात.

राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजासत्ताक पार्टी आणि इतर काही हिंदू संस्था नेपाळ हिंदू राष्ट्र राहावे यासाठी मोहीम चालवत आहेत देश नवीन घटना तयार करण्याच्या तयारीत असताना हे सर्व चालले आहे. नेपाळची घटना बनवण्याचे काम अत्यंत किचकट झाले आहे. गेली आठ वर्षॅ त्यावर केवळ चर्चाच चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)