मुलासह अपहरण झालेल्या महिलेचा तपास करण्याची मागणी

नगर – गुंडेगाव (ता.नगर) हराळ मळा येथील पारधी समाजाच्या महिलेचे तिच्या मुलासह अपहरण करण्यात आले असता याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करुन तिचा शोध घेण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, मोहन काळे, नामदेवराव चांदणे, संभाजी भोसले, कडूबाबा लोंढे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवार दि.25 मार्च रोजी पूजा राहुल चव्हाण घर काम करीत असताना तिला व तीन वर्षीय मुलगा यश याला अज्ञात इसमांनी गाडीत टाकून घेऊन गेले. तर अजून एक मुलगा झोपेत असल्याने तो घरीच राहिला.

या प्रकरणी चव्हाण कुटुंबीय नगर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता, फिर्याद न घेता सदर महिलेचा नातेवाईकांकडे शोध घेण्याचा सल्ला पोलीसांनी दिला. नातेवाईकांसह अनेक ठिकाणी शोध घेऊन देखील अपहरण झालेल्या महिलेचा व मुलाचा शोध अद्यापि लागलेला नाही. तरी तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन, सदर महिलेचा शोध घेण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)