सरकारच्या योजनांमुळे स्वयंपाकाच्या गॅसची मागणी वाढणार

नवी दिल्ली – पेट्रोलियम सचिव एम. एम. कुट्टी यांनी सांगितले की, देशात एलपीजीची मागणी 2025 पर्यंत 34 टक्के वाढण्याची शक्‍यता आहे. आशिया एलपीजी संमेलनात संबोधित करताना कुट्टी म्हणाले की, एलपीजी ग्राहकांच्या संख्येत वार्षिक आधारावर 15 टक्के वाढ झाली आहे. वर्ष 2014-15 मध्ये एलपीजी ग्राहकांची संख्या 14.8 कोटी होती ती संख्या 2017-18 मध्ये वाढून 22.4 कोटी झाली आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ गॅस इंधन उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

लोकसंख्या वाढ आणि ग्रामीण भागात एलपीजीचा झालेला विस्तार यामुळे एलपीजी ग्राहकांच्या संख्येत सरासरी 8.4 टक्के वाढ झाली आहे. यामुळे 2.25 कोटी टनसह भारत जगातील दुसरा सर्वांत मोठा एलपीजी ग्राहक असलेला देश झाला आहे.

2025 पर्यंत एलपीजीचा वापर वाढून 3.03 कोटी टनापर्यंत जाईल. 2040 पर्यंत हा आकडा 4.06 कोटी टनवर जाईल. कुट्टी यांनी सांगितले की, सरकारने देशात एलपीजीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)