निवडणुक निकाल निष्कर्ष चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी !

नगर: निवडणुकित नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या निवडणुक निकाल निष्कर्ष सुपारी चाचण्यांवर बंदी आणण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनने भारतीय निवडणुक आयोगाकडे केली असल्याची माहिती ऍड.कारभारी गवळी यांनी दिली.

निवडणुक काळात अनेक सर्व्हे करणाऱ्या कंपन्या राजकीय पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन त्यांच्या बाजूने कौल देऊन त्यांचे उमेदवार निवडून येणार असल्याचे निष्कर्ष टिव्ही चॅनल व वृत्तपत्र अथवा सोशल मिडीयावर जाहिर करतात. माध्यमांचे चॅनल व वृत्तपत्रावर नागरिकांची विश्‍वाहर्ता टिकून असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या विचारावर परिणाम होऊन त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. मतदानापुर्वी एखादा उमेदवार निवडून आल्याचे जाहिर करणे हा आचारसंहितेचा भंग असून, अशा निवडणुक निकाल निष्कर्ष सुपारी चाचण्यांवर बंदी आणण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन भारतीय निवडणुक आयोगाकडे पाठविण्यात आले आहे.

राजकीय दृष्ट्‌या जागृक असलेल्या नगर जिल्हा मतदारसंघात आचारसंहितेचा उगम झाला. मात्र सध्याच्या निवडणुकित नैतिकतेचा ऱ्हास होत असून, कोण-कोणत्या पक्षाचा, उमेदवाराचे विचार, धोरण समजणे सर्वसामान्य मतदारांना अवघड बनले आहे. ध्रुतराष्ट्राप्रमाणे राजकीय मंडळी वागत असून, स्वत:च्या हितासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. अशा पध्दतीचे निष्कर्ष जाहिर करुन मतदारांना संभ्रमात टाकण्याचे प्रकार होणार असून, याला तातडीने लगाम लावण्याची मागणी करण्यात आल्याचे ऍड.गवळी यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)