संघातील स्वयंसेवकांच्या काठीवर बंदी घालण्याची मागणी 

जिल्हा सत्र न्यायालयाची सरसंघचालकांना नोटीस 

नागपूर  –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असलेल्या स्वयंसेवकांकडील काठीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने सरसंघचालक मोहन भागवत यांना नोटीस बजावली आहे.

याबाबत मोहनिस जबलपुरे यांनी याचिका दाखल केली आहे. पथसंचलनात स्वयंसेवकांनी हातात काठी घेऊन सामील होणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. जबलपुरे यांनी याचिकेत म्हटले आहे की, सरसंघचालक मोहन भागवत आणि अनिल भोकरे यांनी स्वयंसेवकांना काठी घेऊन पथसंचलनात सामील होण्याचे निर्देश दिले. मात्र, हा प्रकार म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे.

-Ads-

यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी माहिती अधिकारांतर्गत पोलिसांकडूनही माहिती मागवली होती. पोलिसांनी पथसंचलनाला परवानगी देताना काही अटी ठेवल्या होत्या. यात पथसंचलनात काठीचे प्रदर्शन करु नये किंवा बाळगू नये. तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असे यात म्हटल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी पोलिसांकडेही धाव घेतली होती. पुरावे म्हणून छायाचित्रही दिले होते. मात्र, पोलिसांनी दखल घेतली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)