प्रचारातील रोड शो आणि बाईक रॅलीवर बंदीची मागणी फेटाळली

नवी दिल्ली: निवडणूक प्रचारादरम्यान “रोड शो’ आणि “बाईक रॅली’वर बंदी घालण्यात यावी, यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. उत्तर प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक विक्रम सिंह आणि पर्यावरणवादी शैविका अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली होती. रोड शो आणि बाएक रॅली मुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांचा भंग होतो. हवा आणि ध्वनि प्रदूषण वाढून पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तसेच वाहतुक कोंडी होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतात, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

वाहन रॅलीतील प्रत्येक वाहनाची नोंदणी होणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच वाहनांचा ताफा 10 वाहनांपेक्षा अधिक नसावा, असे निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सूचनांमध्ये म्हटले आहे. तसेच दोन वाहनताफ्यांमध्ये किमान 200 मीटरचे अंतर असावे. रस्त्याच्या अर्ध्यापेक्षा अधिक भाग वाहनांनी व्यापलेला असू नये, असे निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सूचनांमध्ये म्हटले आहे. मात्र या सूचना केवळ कागदावरच राहतात, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हा दावा मान्य केला नाही आणि याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)