दिल्ली, यूपीसह सहा राज्यात ‘पेट्रोल-डिझेल’ आणि ‘दारू’वर एकसमान टॅक्स

नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि संघशासित चंदीगढ राज्यात पेट्रोलियम उत्पादनांवर ‘एक समान’ टॅक्स लावण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली आहे. एका अधिकृत विधानानुसार पेट्रोलियम उत्पादनां शिवाय राज्य दारू, वाहन नोंदणी आणि परवानाच्या बाबतीत ‘एकसमान टॅक्स’ दर ठेवण्याच्या बाबतीत सहमत झाले आहे.

पाच राज्याचे अर्थमंत्री आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे अधिकारी यांच्यात या प्रकरणी एक बैठकीदरम्यान चर्चा होऊन सहमत झाले आहे. बैठकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेस वरील टॅक्सचा दर समान ठेवण्याबाबत सर्वाचे एकमत झाले आहे. बैठकीत समाविष्ट राज्यांनी यासाठी एक उपसमिति स्थापन करण्यााचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थापन केलेली उपसमिती येत्या पंधरा दिवसात ‘एक समान’ दर ठेवण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. एक समान दर ठेवल्याने व्यापारात होणारी हेरा-फेरी तसेच काळाबाजार देखील थांबेल असा निष्कर्ष सुध्दा या बैठकीत काढण्यात आला आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बैठकीनंतर म्हटले आहे की, यामुळे सरकारचे महसूल वाढेल आणि काळाबाजार सुध्दा थांबेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)